पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा, म्हणाले…


नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट करत महाराष्ट्रातील जनतेला मराठीतून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका महाराष्ट्र बजावत आहे. तसेच राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या, महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी आपल्या मूळाशीही घट्ट जोडलेले आहे.

राज्याच्या प्रगतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्याला आज १ मे २०२५ रोजी ६५ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे आजच्या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या निमित्ताने आज राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज मुंबईतील हुतात्मा चौक स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज वर्षा या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास वंदन केले.

यावेळी पोलीस दलाकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. दरम्यान, आज महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच देशातील अनेक मान्यवरांनी आज महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!