पुण्यात प्रेग्नंट महिलेने आयुष्य संपवलं, चिठ्ठीत गूढ उकललं, दुसऱ्याच नवऱ्यावर गुन्हा दाखल, नेमकं घडलं काय?

पुणे : पुणे जिल्ह्यात नांदेड सिटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत धायरी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. याठिकाणी पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. शिल्पा मल्लिकार्जुन चलवादी (वय २६, रा. गजानन संकुल, धायरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
या घटनेने एकच खळबळ उडाली असून याबाबत पोलीस तपास करत आहेत. पत्नीचा शारिरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी मल्लिकार्जुन मऱ्याप्पा चलवादी (वय २६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मयत शिल्पा यांना आधीच्या पतीपासून एक मुलगा आहे.
असे असताना पतीसोबत होणाऱ्या वादामुळे ती विभक्त झाली होती. त्यानंतर मल्लिकार्जुन याच्याशी शिल्पाचे प्रेमसंबंध जुळले. मल्लिकार्जुन ठेकेदार आहे. दोन वर्षांपूर्वी दोघांनी विवाह केला. त्यानंतर शिल्पा मुलासह मल्लिकार्जुन याच्यासोबत धायरीत राहायला आली. शिल्पा गरोदर होती. घटनेच्या आधी तिने मुलाला बहिणीकडे सोडले.
तसेच तिला सांगितले की, रुग्णालयात तपासणी करायला जाते, त्यानंतर ती धायरीतील घरी आली. तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.शिल्पाचे वडील भीमाप्पा चौडप्पा चलवादी (वय ५३, रा. रेल्वे उड्डाणपुलाजवळ, मुंढवा) यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड तपास करत आहेत.
आत्महत्या करण्यापूर्वी शिल्पाने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली. यामध्ये तिने यामध्ये सगळी माहिती लिहून ठेवली असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत आता पोलीस तपास करत आहेत. या घटनेने मात्र सगळेच हादरले आहेत. याबाबत पोलिसांनी तपास सुरु केलं आहे.