आत्याकडे वाढली… तिच्याच मुलाशी लग्न; पुण्यात 21 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, कदम मायलेकावर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?


वाघोली : वाघोली परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हुंडा व पैशांच्या मागण्यांमुळे होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका 21 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात सासू आणि पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहितेचे नाव प्रतिक्षा जयसिंग कदम (वय 21) असे असून, तिचे वडील बन्सी योगीराज खामकर (रा. ता. केज, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, प्रतिक्षाचा विवाह 9 मे 2023 रोजी मोठ्या थाटामाटात जयसिंग कदम याच्यासोबत पार पडला होता. लग्नावेळी प्रतीक्षाच्या वडिलांनी क्षमतेनुसार खर्च केला होता आणि वराला 5 ग्रॅम सोन्याची अंगठी देण्यात आली होती. लग्नानंतर आणखी एक अंगठी देण्याचे ठरले होते.

महत्वाची बाब म्हणजे प्रतिक्षा ही लहानपणापासून तिच्या आत्याच्या म्हणजेच हौसाबाई कदम यांच्या घरीच राहत होती. तिच्या आई-वडिलांना सतत ऊसतोडीच्या कामासाठी बाहेर जाणं होत असल्याने आणि आत्याकडे मुलगी नसल्यामुळे प्रतिक्षाचा सांभाळ लहानपणापासून त्यांच्याकडेच झाला होता.

ती शिक्षणासाठी आणि वाढीसाठीही त्याच घरात राहिली होती, त्यामुळे ती त्या कुटुंबाशी अगदी जवळची होती. याच कारणामुळे पुढे आत्याने मुलगा जयसिंगच्या लग्नासाठी मागणी घातली. जयसिंग हा फरशी बसविण्याचे काम करत होता. कुटुंबीयांच्या संमतीने प्रतीक्षाचा विवाह आत्याचा मुलगा जयसिंग कदम याच्यासोबत 9 मे 2023 रोजी करण्यात आला.

मात्र, लग्नानंतर साधारण सहा महिन्यांनी प्रतिक्षाच्या सासरकडून बाकी अंगठीची मागणी सुरू झाली. सासू हौसाबाई कदम आणि पती जयसिंग कदम हे सतत या मागणीवरून तिला टोमणे मारणे, शिवीगाळ करणे आणि मानसिक त्रास देत होते. काही काळ परिस्थिती सामान्य झाली, मात्र त्यानंतर पुन्हा छळाचे प्रमाण वाढल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!