Pradeep Kand : प्रदिप कंदांना आश्रू झाले अनावर! तीन वेळा उमेदवारी माघितली, मिळाली नाही आता मात्र थांबणार नाही – प्रदिप कंद

Pradeep Kand उरुळीकांचन : आयुष्यातील प्रत्येक क्षण हा जनतेच्या सेवेसाठी व्यथित केला आहे.आपण राजकीय भूमिकेतून आयुष्यात क्षणक्षण जनतेच्या सेवेसाठी खर्ची केल्याचे समाधान आहे. या सर्व भूमिकेत कौटुंबिक जीवनात वेळ मिळाला नसल्याचे सांगून पुढील भूमिका ही जनतेच्या हितासाठी असून शिरुर-हवेली तालुक्यात विकासाचे व्हिजन घेऊन काम करणार आहे. शिरुरच्या वैभवाचे दिवंगत नेते बाबुराव पाचर्णे यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहणार असून त्यांनी माझ्यात पाहिलेले आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे भावनाविश उद्धारभाजप नेते प्रदिप कंद यांनी काढून विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.
शिरुर -हवेली मतदारसंघात भाजप व प्रदिप कंद समर्थकांचा विराट निर्धार मेळावा पेरणेफाटा येथे संपन्न झाला. या मेळाव्यात भाजप नेते व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदिप कंद यांनी विधानसभा लढविण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. निर्धार मेळाव्यात प्रदिप कंद समर्थकांनी व भाजप कार्यकर्त्यांच्या प्रचंड रेट्याचा सामना मेळाव्यात प्रदिप कंद यांना करावा लागला असून निवडणूक लढविण्याची तीव्र भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
यामेळाव्यासाठीयशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप ,माजी जिल्हा परिषदेचे सदस्य रामभाऊ दाभाडे, शंकरकाका भूमकर, पुणे जिल्हा भाजप समन्वयक धमेंद्र खांडरे, हवेली बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, शशिकांत गायकवाड, सुदर्शन चौधरी, शिरूर बाजार समितीचे संचालक राहुल गवारे, राजाभाऊ मांडरे, भाजप शिरुर तालुकाध्यक्ष आबा सोनवणे, हवेली तालुकाध्यक्ष श्याम गावडे, पै. संदिप भोंडवे , संदिप सातव, अजिंक्य कांचन, कमलेश काळभोर, विकास जगताप, कुंडलिक थोरात आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. Pradeep Kand
प्रदिप कंद म्हणाले, राजकीय आयुष्यात क्रिकेट खेळाडू ते विद्यार्थी दशेतच ग्रामपंचायत सदस्य ते सरपंचपद अशी जबाबदारी गावकऱ्यांच्या प्रेमात मिळाली. संघटनेत काम म्हणून राष्ट्रवादी चे युवक अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारुन युवकांना राष्ट्रवादीत काम करण्याची संधी मिळून दिली. सन २००२ मातोश्रींना जिल्हा परिषदेत पाठविण्याची संधी असू की २००४ मध्ये विलास लांडे यांना आमदार म्हणून निवडून आणण्याची जबाबदारी पूर्ण केली. २००७ ला जिल्हा परिषद गट विजय करण्याची ताकद सर्वांनी माझ्यामाध्यमातून दाखवून दिली. २०१२ ला जिल्हा परिषदेवर विक्रमी साडे चौदा हजार मताधिक्याने विजय राज्यात सर्वाधिक ठरला.
या कामगिरीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविताना जिल्ह्यातील साडे अकरा हजार विद्यार्थांचा घटलेली पटसंख्या गुणवत्तेने सुधारुन दाखविली. विद्यार्थ्यांना सायकल, गणवेश साहित्य, शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या सारख्या निर्णय घेतले. शिरुर मध्ये ३५० कामे तर जिल्ह्यात ३,५०० कोटींचे विकासकामे इतका विकासकामांचा आलेख उंच ठेवला परंतु २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करुन आक्षेप घेण्यात आले. परंतु निष्ठा ठेवत २०१९ पर्यंत अपमान झेलत पक्षात काम केले.
२०१९ ला अजित पवार, दिलीप वळसेपाटील यांनी उमेदवारीचा शब्द दिला. पण उमेदवारी मिळाली नाही आता २०२४ ते स्वतः हा उभे राहणार म्हणल्यावर मी थांबलो परंतू त्यांनी मतदारसंघ भाजपला सोडविण्याचे धैर्य न दाखविल्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. दोनवेळा थांबून संधी मिळत नसल्याने शेवटी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवून शिरुर -हवेलीची जागा अपक्ष निवडणूक लढवून जिंकून दाखविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.