पोस्टाची गेमचेंजर योजना ; फक्त व्याजामधून होणार 12 लाख रुपयांपेक्षा जास्तची कमाई ..


पुणे : पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित ठिकाण मानल जाते. या पोस्ट ऑफिसमध्ये सीनियर सिटीजन सेविंग्स स्कीममध्ये 30 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. यावर वर्षाला सध्या 8.2 टक्के व्याज मिळतं. याचा अर्थ दर महिन्याला जवळपास 20,500 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतात. वर्षाला 2.46 लाख रुपये तुम्हाला व्याजामधून मिळतील. म्हणजे पाच वर्षात फक्त व्याजामधून तुम्ही 12 लाख 30 हजार रुपयाची कमाई करु शकता.

ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजे ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे अशा नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. पण अपवादात्मक परिस्थितीत साठ वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या नागरिकांना सुद्धा यामध्ये गुंतवणूक करता येते. अपवादत्मक परिस्थिती म्हणजे जे स्वैच्छेने निवृत्ती घेतात अशा नागरिकांना 55 वर्षानंतर यामध्ये गुंतवणूक करता येते.

सामान्यपणे बँका एफडीमधून 6-7% व्याज देतात. यात SCSS मध्ये 8.2% फिक्स रिटर्न मिळत आहे. ते ही सरकारी गॅरेंटी सोबत. म्हणजे कुठलीही रिस्क नाही. ही स्कीम खासकरुन त्या लोकांसाठी बनवली आहे, ज्यांना रिटायरमेंट नंतर स्थिर आणि सुरक्षित इनकम हवं आहे. आधी या योजनेत केवळ 15 लाख रुपये गुंतवणूकीची परवानगी होती. आता सरकारने ही रक्कम दुप्पट करुन 30 लाख रुपये केली आहे. यात निवृत्त लोकांना जास्त फायदा मिळू शकतो. तुम्ही पती-पत्नी मिळून खातं उघडत असाल, तर हा फायदा आणखी वाढू शकतो.

       

पोस्टाच्या या योजनेत एखाद्या सीनियर सिटीजन ग्राहकाने 30 लाख रुपये गुंतवले तर त्यांना सध्याच्या 8.2% दराने पाच वर्षात 12 लाख तीस हजार रुपयांचे व्याज मिळणार आहे. अर्थात वर्षभरात गुंतवणूकदाराला 2 लाख 46 हजार रुपये व्याज स्वरूपात मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!