राजकारणात खळबळ! अजित पवारांच्या आमदाराकडून महिला पदाधिकाऱ्याचा छळ, काँग्रेस महिला तालुका अध्यक्षांनी केलं विष प्राशन..

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे कळवणचे आमदार नितीन पवार यांच्याकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून एका महिला पदाधिकाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कळवणमध्ये काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षांनी शीतल महाजन असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव आहे.
या घटनेने एकच खळबळ उडाली असून याबाबत चौकशीची मागणी केली जात आहे. आमदार नितीन पवार हे आपल्या पतीला वारंवार त्रास देतात, त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा आरोप महिलेनं केला आहे. त्यांनी अभोणा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत तपास सुरु आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत आपण विरोधात काम केल्याचा राग काढत असल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. याबाबत आमदार नितीन पवार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. महिलेने केलेल्या आरोपात कुठलंही तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यामुळे यावर अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीत शीतल महाजन यांनी आमदार नितीन पवार व जयश्री पवार यांच्या विरोधात काम केल्यामुळे पती ग्रामसेवकाला खोट्या तक्रारी करून अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अनेकवेळा चौकशी होऊनही तक्रारीत तथ्य आढळलं नाही. तरीही त्रास सुरूच होता असे त्यांनी म्हटले आहे.
आता तर आमदार नितीन पवार यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत महाजन यांचेवर कारवाईची मागणी केली होती. त्याच त्रासाला कंटाळून मी विषारी औषध घेऊन आत्महत्या करीत असल्याचा आरोप त्यांच्या भाऊ योगेश गायकवाड यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रार अर्जात केला आहे. याबाबत आता चौकशीची मागणी केली जात आहे.