PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली, नेमकं काय म्हणाले?


PM Modi : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर २०२३ मध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आले होते. पण अवघ्या आठ महिन्यात शिवरायांचा पुतळा कोसळला. या घटनेमुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली. विरोधक राज्य सरकारवर तुटून पडले. PM Modi

या घटनेनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराच्या कामाचं भूमीपूजन झाले. तसेच अनेक विकासकामांचे उद्घाटन झाले. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची माफी मागितली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

सिंधुदुर्गात जे झालं. ते माझ्यासाठी शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही. ते आमच्यासाठी शिवाजी महाराज हे फक्त राजा महाराज, राजपुरुष नाहीत. आमच्यासाठी शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे. मी आज डोकं झुकवून माझ्या आराध्यदैवतेला चरणावर मस्तक ठेवून माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहे.

भारताचे महान सपुत वीर सावरकरांना शिव्या देतात. अपमानित करतात असे लोक आम्ही नाहीत. देशभक्तांच्या भावनांचा चुरडा करतात. सावरकरांचा अपमान करूनही माफी मागत नाही. कोर्टात जातात, पण त्यांना पश्चात्ताप होत नाही. हे यांचे संस्कार आहे.

मी इथे आल्यावर शिवाजी महाराजांच्या चरणावर डोकं टेकवून माफी मागत आहे. जे लोक शिवाजी महाराजांना अराध्य दैवत मानतात त्यांच्या काळजाला ठेच लागली आहे. अशा आराध्य दैवतेचे पूजा करणाऱ्यांची मी माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहे. आमच्यासाठी अराध्य दैवतेपेक्षा काहीच मोठं नाही, अशी भावना मोदींनी व्यक्त केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!