Patanjali Ads : न्यायालयाने खडसवल्यानंतर पतंजलीने मागितली जाहीर माफी, वर्तमानपत्रात माफीनामा…

Patanjali Ads : प्रसिद्ध योग गुरू रामदेवबाबा यांच्यासमोरी अडचणी काही थांबता थांबताना दिसत नाहीये. पतंजली फसव्या जाहिरात प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. पतंजलीने सुप्रीम कोर्टाला सांगितले की, त्यांनी ६७ वर्तमानपत्रांमध्ये जाहीर माफी मागितली आहे.

येत्या काळात आणखी मोठ्या आकाराची जाहिरात प्रसिद्ध होईल, असे पतंजलीकडून न्यायालयामध्ये सांगण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने या सुनावणीची व्याप्ती वाढवली आहे. हे प्रकरण फक्त एका संस्थेपुरते म्हणजे पतंजलीपुरते मर्यादित राहणार नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींद्वारे उत्पादनांची विक्री करून लोकांच्या आरोग्याशी खेळणा-या इतर कंपन्यांवर काय कारवाई केली? असा न्यायालयाने केंद्र सरकारला सवाल केला आहे. Patanjali Ads

अॅलोपॅथी डॉक्टर त्यांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये विशिष्ट ब्रँडची महागडी औषधे का लिहून देतात? असा सवाल न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनला केला आहे. जाणूनबुजून महागडी औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्याची तरतूद आहे का? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला केली आहे.

दरम्यान, कोर्टाने या प्रकरणात प्रत्येक राज्याच्या औषध परवाना प्राधिकरणाला पक्षकार बनवले आहे. पतंजली (बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण) प्रकरणाची ३० एप्रिलला सुनावणी होणार आहे. नव्याने व्याप्ती वाढवलेल्या प्रकरणाची ७ मे रोजी सुनावणी होणार आहे.