पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, बीडच्या पोराला पुण्यात पकडलं, नेमकं प्रकरण काय?


पुणे : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि त्रासदायक कॉल करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आता अश्लील मेसेज करणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अमोल काळे (वय. २५) असे आरोपीचे नाव असून, तो पुण्यात राहत असून मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. या प्रकारामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजप कार्यालयात सोशल मीडिया समन्वयक म्हणून कार्यरत असलेल्या निखिल भामरे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७८ आणि ७९ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये एफआयआर नोंदवला.

दरम्यान, चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यानंतर त्याला बीएनएस कायद्यानुसार नोटीस देण्यात आली आणि अधिक तपासासाठी मुंबईत आणण्यात आले. औपचारिकरित्या त्याला अटक करण्यात आली आहे.

आरोपी अमोल काळे हा विद्यार्थी असून त्याने अश्लील भाषा का वापरली आणि त्यामागील हेतू काय होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अशा प्रकारची गंभीर सायबर गुन्हेगारी राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या धोकादायक ठरू शकते, त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!