आजपासून पॅन कार्ड नियमांमध्ये बदल; सावधान! ‘ही’ चूक ठरू शकते महागात…


पुणे : देशातील करदात्यांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. आयकर विभागाने पॅन आणि आधार कार्ड लिंक न केलेल्या नागरिकांना तत्काळ ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

सरकारने यापूर्वी अनेक वेळा मुदतवाढ दिल्यानंतर आता लिंकिंग न केलेल्या पॅन कार्डना ‘निष्क्रिय’ घोषित करण्यात येत आहे. त्यामुळे अशा पॅनचा वापर अनेक आर्थिक व्यवहारांसाठी करता येणार नाही.

पॅन निष्क्रिय झाल्यास आयकर रिटर्न भरणे, बँकिंग व्यवहार, तसेच मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये अडचणी येऊ शकतात. याशिवाय, अशा प्रकरणांमध्ये जास्त दराने TDS कपात होण्याची शक्यता असते.

पॅन पुन्हा सक्रिय करण्यासाठी नागरिकांना आधारशी लिंक करणे आवश्यक असून, यासाठी निर्धारित ₹1000 शुल्क भरावे लागते. तसेच, पॅन आणि आधारमधील माहिती जुळत नसल्यास नागरिकांना दुरुस्ती करून बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण करावी लागू शकते. आयकर विभागाने नागरिकांना विनंती केली आहे की, कोणत्याही अडचणी टाळण्यासाठी लवकरात लवकर पॅन-आधार लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करावी.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!