सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी परिस्थिती!! रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना डिवचले, नेमकं काय घडलं?


संभाजीनगर : सिल्लोडवरून अनेकदा भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. नुकतेच प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पक्षाने संधी दिली तर २०२९ मध्ये लोकसभा लढवणार असल्याची इच्छा व्यक्त केली. तसेच रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना पुन्हा एकदा डिवचले आहे.

सिल्लोडमध्ये पाकिस्तानसारखी परिस्थिती आहे. महापुरुषाच्या नावाने सार्वजनिक ठिकाणची जागा बळकावण्याचे काम सुरू आहे, असे त्यांनी म्हटले आहे. सिल्लोडमध्ये जिल्हा परिषदेची चार-पाच एकर जागा महापालिकेत घेतली आहे. अब्दुल सत्तारांनी मंत्रिपदाच्या काळात ज्या भानगडी केल्या, त्यामुळे त्यांचे मंत्रिपद गेले, असा हल्लाबोल अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

तसेच यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले की, मी राज्यसभेवर आणि विधानसभेवर जाणार नाही. मला पक्षाने खूप काही दिले आहे. माझी दोन मुले आमदार आहेत. जर पक्षाने संधी दिली तर मी पुढची लोकसभा निवडणूक पुन्हा लढवेन, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. यामुळे आगामी काळात त्यांनी पक्षासाठी संघटनेत काम करणार असल्याचे सांगितले.

तसेच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले की, संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. राजकीय पक्षांनी एकत्र बसू नये का? आम्ही एकत्र बसतो हे संजय राऊत यांचे दु:ख आहे. आमचा पक्ष म्हणजे परिवार असून यांचा पक्ष परिवाराचा पक्ष आहे, असेही ते म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!