दादांच्या कारखान्यावर विरोधकांचे मनोमिलन होणार? माळेगावमध्ये उत्सुकता शिगेला, काही तासाच निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होणार…


माळेगाव : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक जवळ आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात असलेला हा कारखाना यावेळी युतीच्या समिकरणामुळे कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माळेगाव हा शरद पवार आणि अजित पवार यांना मानणारा कारखाना म्हणून ओळखला जातो.

गतवेळी सहकारातील तज्ञ आणि भाजपचे नेते चंद्रराव तावरे, कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन काका तावरे यांच्या हातातून अजित पवार यांनी हा कारखाना घेतला होता. आज घडीला माळेगाव कारखान्याचे 19 हजार 549 सभासद आहेत. बारामती तालुक्याच्या राजकारणात या कारखान्याला महत्त्वाचे स्थान आहे.

यामुळे सगळेच रिंगणात उरणार आहेत. दरम्यान, यामध्ये चंद्रराव तावरे, कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन काका तावरे हे गुरू-शिष्य पवार कुटुंबियांचे कट्टर विरोधक आहेत. सध्या अजित पवार भाजपसोबत आहेत. त्यामुळे अजित पवार आणि तावरे एकत्र येणार अशी सभासदांमध्ये चर्चा आहे. याबाबत अजून कोणता निर्णय झाला नाही.

दरम्यान, तावरे यांचा पक्षविरहित निवडणुका लढल्याचा इतिहास असल्याने उत्सुकता कायम आहे. याबाबत काय निर्णय होणार हे लवकरच समजेल. माळेगावची निवडणूक ताकदीने लढवण्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच युगेंद्र पवार यांनी केली होती. यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा एकदा काका पुतणे समोर येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या काही तासांत जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे लवकरच याबाबत माहिती पुढे येईल. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना, कष्टकरी शेतकरी समिती यांनी देखील निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. सगळ्यानी भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!