लाडक्या बहिणींना सणाआधी मोठी खुशखबर; गौरी आगमनाच्या मुहूर्तावर खात्यात जमा होणार पैसे


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेची राज्यभर चर्चा आहे. जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १,५०० रुपयांची आर्थिक मदत जमा केली जाते.

जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही. आता सप्टेंबर महिना सुरू झाल्याने ऑगस्टचा हप्ता नेमका कधी मिळणार, याची प्रतीक्षा लाभार्थी महिलांना आहे. याचदरम्यान ऑगस्टच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

गौरी आगमनाच्या मुहूर्तावर पैसे मिळणार?

समोर येत असलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवाच्या काळात विशेषतः गौरी आगमनाच्या दिवशी किंवा त्याच्या आसपास ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याबाबत सरकारकडून विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

असे झाल्यास सणासुदीच्या काळात महिलांच्या खात्यात १,५०० रुपये जमा होऊ शकतात. त्यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, गौरी आगमनाच्या वेळीच हप्ता जमा होणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा सरकारकडून अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे अधिकृत निर्णय होईपर्यंत लाभार्थी महिलांनी याची खात्रीशीर माहिती म्हणून नोंद घेऊ नये.

निवडणुकीपूर्वी सुरू झाली होती योजना

विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन महायुती सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत ठरावीक पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १,५०० रुपयांची आर्थिक मदत जमा केली जाते.

विधानसभा निवडणुकीत या योजनेचा महायुतीला मोठा राजकीय फायदा झाल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. त्यानंतर योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली.

ई-केवायसीनंतर अनेक नावे वगळली

ई-केवायसी आणि पात्रता पडताळणीनंतर या योजनेसाठी अपात्र ठरणाऱ्या अनेक लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली. काही ठिकाणी पात्रता नसतानाही योजनेचा लाभ घेतल्याची प्रकरणे समोर आली होती. पुरुषांनीही चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतल्याची काही प्रकरणे उघडकीस आली होती.

त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार, याकडे राज्यातील पात्र लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!