आता लाडक्या बहीणींना एप्रिल-मे महिन्याचे एकत्रित ३ हजार रुपये मिळणार? महत्वाची माहिती आली समोर…

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही, त्यामुळे आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत लवकरच सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
लाडकी बहिण योजना ही महायुती सरकारच्या सर्वात प्रभावशाली योजनांपैकी एक असून, योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये ची मदत दिली जाते. मात्र एप्रिल महिना संपूनही लाभार्थींना हप्ता मिळालेला नाही.
त्यामुळे महिलांमध्ये नाराजी पसरली असून, सरकारकडून स्पष्ट घोषणा न झाल्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र काही मीडिया रिपोर्टनुसार, मे महिन्यात दोन्ही हप्ते म्हणजे एकूण ३००० हजार एकत्रच लाभार्थींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. याआधीही फेब्रुवारी व मार्च महिन्याचे हप्ते एकत्र देण्यात आले होते.
दरम्यान, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच तांत्रिक कारणांमुळे हप्त्याच्या वाटपात विलंब झाल्याचे समजते. सरकारने यापूर्वी वेळोवेळी सांगितले आहे की, पात्र महिलांना नियमित स्वरूपात रक्कम देण्यात येईल.