आता एसटी बसमध्येही ‘पॅनिक बटण’, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय..


मुंबई : सध्या राज्यातील एसटी बस स्थानके अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यात येत आहेत. गेल्या काही कालावधीपासून महिलांच्या एसटी प्रवासातील सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काही निर्णय आता घेण्यात आले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता बसमध्ये ‘पॅनिक बटण’ लावण्यात येणार आहे. प्रत्येक बसस्थानकावर व नवीन येणाऱ्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. यासह एसटी बस स्थानकांचे आधुनिकरण करून, प्रवाशांना दर्जेदार सुविधा प्रदान करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

राज्य परिवहन महामंडळाची राज्यभरात ८४२ ठिकाणी १,३६० हेक्टर जमीन आहे. त्याचे शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण असे वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ किंवा खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर या जमिनी विकसित केली जाणार आहे. त्यामध्ये सर्व बसस्थानकावरील प्रसाधनगृहे ही अत्याधुनिक पद्धतीची स्वच्छ व निर्जंतुक असतील. तसेच प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ केली जाईल, सरनाईक यांनी सांगितले.

भविष्यात एसटी आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवाशांना दर्जेदार दळणवळण सेवा देण्यासाठी काही चांगले निर्णय घेण्यात येणार आहेत. एसटीच्या अविकसित जागाही चांगल्या विकासकाकडून विकसित होतील. राज्यातील १३ कोटी जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर परिवहन सेवा देणारी एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे. असेही ते म्हणाले.

यामध्ये एसटी आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवाशांना दर्जेदार दळणवळण सेवा देण्यासाठी काही चांगले निर्णय घेण्यात येणार आहेत. तसेच आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन कधीही रखडणार नाही याची जबाबदारी मी घेईन, असे आश्वासन देखील सरनाईक यांनी दिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!