नितेशने जपून बोलावं, मी भेटल्यावर…; भावाच्या त्या वक्तव्याने नीलेश राणे संतापले, नेमकं काय घडलं?


मुंबई : भाजप नेते नितेश राणे आपल्या वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. नितेश राणे यांच्या एका वक्तव्यामुळे महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे. त्यांचे मोठे भाऊ आणि शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सर्व पक्ष तयारी करत आहेत. सत्ताधारी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. नीलेश राणे यांनी भावाला सार्वजनिक ठिकाणी विचारपूर्वक बोलण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली. नीलेश राणे म्हणाले, नितेशने जपून बोलावे.

तसेच ते म्हणाले, मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींच भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे, पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही, असा मोठा सल्ला त्यांनी दिला आहे.

यामुळे आता आगामी काळात यावर आणखी काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. राणे बंधूंमधील या मतभेदांमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. राणे बंधू अनेकदा वेगवेगळी वक्तव्य करत असतात. यामुळे स्वतःच्याच पक्षामध्ये मोठी अडचण निर्माण होते.

दरम्यान, आता नीलेश राणे यांच्या प्रतिक्रियेमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महायुतीमध्ये सर्व काही ठीक आहे का, असा प्रश्न आता विचारला जात आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा मोठा परिणाम देखील दिसून येऊ शकतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!