Nitesh Rane : मोठी बातमी! वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांना भोवलं, राणेंविरोधात गुन्हा दाखल…

Nitesh Rane : अहमदनगरमध्ये महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधातील काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य करणे चांगलेच भोवले आहे.
या घटनेनंतर अहमदनगर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी रविवारी रात्री उशीरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लिमांना निवडून- निवडून मारणार असल्याची धमकी नितेश राणे यांनी दिली होती.
या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर चिथावणीखोर भाषणे आणि हत्येच्या धमकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन ठिकाणी नितेश राणे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला गुन्हा श्रीरामपूर आणि दुसरा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. Nitesh Rane
नितेश राणेंनी मुस्लिमांना खुलेआम धमक्या दिल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ अहमदनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हिंदू समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
त्यानंतर नितीश राणेंनी सभेत मुस्लिमांना उघडपणे धमकी दिली होती. आमच्या रामगिरी महाराजांविरोधात कोणी काही बोलले तर आम्ही मशिदींमध्ये घुसून त्यांची निवडून निवडून हत्या करू, अशी धमकीच त्यांनी दिली होती.