महाराष्ट्रात NDA ला मोठा धक्का बसणार? धक्कादायक सर्व्ह आले समोर, जाणून घ्या कशी असेल आकडेवारी..

Politics : लोकसभा निवडणूक २०२४ वेध सुरु झाले आहे. देशातील अनेक पक्ष लोकसभेच्या जागांची चाचपणीसाठी तयारी करीत आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. ‘एनडीए’ आपली सत्ता टिकवण्यासाठी तर, विरोधकांची आघाडी असलेली इंडिया भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. दोन्ही गट आपली रणनीती आखण्यात गुंतले आहे.
याबाबत २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी ‘एनडीए’ ने ४८ जागांपैकी ४१ जागा जिंकल्या होत्या. ‘एनडीए’ ला फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागले होते. ‘एनडीए’ मधील भाजपला २३, शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. तर, राष्ट्रवादीला चार आणि काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती. त्याचवेळी एआयएमआयएमचा एक खासदारही विजयी झाला होता.
दरम्यान, एक नवीन ओपिनियन पोल समोर आला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रात भाजपप्रणित एनडीए आघाडीला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. सी व्होटरचा सर्वेक्षण अहवाल नुकताच समोर आला आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल येथे भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती असा थेट सामना होणार आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि कॉंग्रेस हे घटक पक्ष आहेत. तर, शिवसेना (एकनाथ शिंदे), अजित पवार (राष्ट्रवादी) आणि भाजप यांची महायुती आहे.
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही भाजप महायुतीला मागे टाकू शकते असे या अहवालावरून दिसून येत आहे. एनडीए युतीला १९ ते २१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, महाविकास आघाडीला २६ ते २८ जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील मतांची टक्केवारी पाहिली तर महाविकास आघाडीला ४१ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी एनडीएला ३७ टक्के मते मिळण्याची अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सी व्होटरच्या सर्वेक्षणात पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या टीमसीला २३ ते २५ जागा मिळू शकतात असे म्हटले आहे. येथे भाजपला १६ ते १८ जागा तर काँग्रेस आणि डाव्या आघाडीला शून्य ते दोन जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये चमकदार कामगिरी केली होती. भाजपने त्यावेळी १८ जागा जिंकल्या होत्या तर टीएमसीने २२ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या खात्यात दोन जागा गेल्या होत्या.