गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी दोन प्रवासी बस पेटवल्या, घटनेने उडाली खळबळ…


गडचिरोली : गडचिराेली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान नक्षलवाद्यांकडून आज भारत बंदची घोषणा यापूर्वीच केली आहे. मात्र नक्षलवाद्यांनी रात्रीच्या वेळी दोन प्रवासी बस पेटवून दिल्या आहेत. या घटनेने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवाया सुरू आहेत. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी रात्री उशिरा दोन खाजगी प्रवासी बसेस जाळले आहेत. या अगोदर हिदूर- दोबुर- पोयारकोटी या रस्त्याच्या कामासाठी आणलेले तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी नक्षलवाद्यांनी जाळून टाकण्यात आले होते.

यानंतर गडचिराेली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आज नक्षलवाद्यांचा भारत बंद आहे. त्या पार्श्वभूमीवर नक्षलवादी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

बिजापूरहून बारसागुडाकडे जाणारी बस तिंबापूर गावाजवळ नक्षलवाद्यांनी थांबवून त्यातील प्रवाशांना उतरवलं आणि ती बस जाळली. त्यानंतर काही किलोमीटर अंतरावर दुसरी बसही नक्षलवाद्यांनी जाळली. रात्री उशीरा ही घटना झाल्याने पोलीस आज सकाळी घटनास्थळी पोहचले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!