पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू आज जेलमधून सुटणार…!


चंदीगड : पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांची शनिवारी पतियाळा येथील मध्यवर्ती कारागृहातून सुटका होणार आहे. सिद्धाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती शेअर करण्यात आली आहे.

 

तुरुंग प्रशासनाने सुटकेची माहिती दिली असल्याचे त्यात म्हटले आहे. 59 वर्षीय काँग्रेस नेते 1988 च्या रोड रेज प्रकरणात एक वर्षाची शिक्षा भोगत आहेत. गेल्या वर्षी 20 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धूला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर पटियाला येथील न्यायालयात शरणागती पत्करली. शिक्षा पूर्ण होण्याच्या 48 दिवस आधी सिद्धूची सुटका होत आहे.

 

 

 

सूत्रांनकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धू यांनी पॅरोल घेतला ना रजा. त्यामुळे त्यांना वेळेपूर्वी सोडण्यात येत आहे. पंजाबचे मंत्री ब्रह्म शंकर झिम्पा यांनी शुक्रवारी सांगितले की, मंत्रिमंडळाने शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांच्या सुटकेला मंजुरी दिली आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!