Nana Patole Car Accident : तो अपघात नव्हेच! नाना पटोले यांना चिरडून मारण्याचा प्रयत्न, काँग्रेसकडून धक्कादायक खुलासा…

Nana Patole Car Accident : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली आहे. पघात एवढा भीषण होता की, नाना पटोले यांच्या गाडीचा पुरता चक्काचूर झाला. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
यावर आता काँग्रेसने आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला.

ही अतिशय गंभीर घटना आहे. त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का?” असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्वीट करत विचारला आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. Nana Patole Car Accident


दरम्यान, नाना पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौरा करून परतत होते. त्यावेळी ताफ्याला भरधाव आणि अनियंत्रित ट्रकने मागून जोरात धडक दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाना पटोले हे ज्या कारमध्ये बसले होते, त्यांच्या कारच्या मागच्या भागाचा चुराडा झाला आहे. सुदैवानं नाना पटोले आणि गाडीतील इतर कोणाला दुखापत झाली नाही.