मुंबईत खळबळ! मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी, दहशतवाद्याची माहितीही आली समोर..

मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई विमानतळ आणि ताजमहल पॅलेसला बॉम्बने उडवण्याच्या धमकीच्या ईमेलमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून तपास सुरू झाला आहे. ईमेलमध्ये दहशतवादी अफजल गुरु आणि सैवक्कू शंकर यांना अन्यायाने फाशी दिल्याचा उल्लेख केला आहे.

सध्या मुंबई पोलिस ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत. ही धमकी मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर पाठवण्यात आली आहे, ज्यामध्ये मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलमध्ये म्हटले आहे की ताज हॉटेल आणि विमानतळाला बॉम्बने उडवले जाईल.
या ईमेलनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून संपूर्ण मुंबईत लष्करी दल तैनात करण्यात आले आहे. सध्या भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्ववभूमीवर दोन्ही देशात वातावरण तापले आहे. अशातच ही धमकी आल्याने खबरदारी घेतली जात आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलवर डॉग स्क्वॉडच्या पथकाने तपासणी केली आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेसंदर्भात खबरदारी घेतली जात आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांची हत्या केली होती. मृतांमध्ये अनेकजण महाराष्ट्रातील होते. भारताने या हल्ल्याचा बदला पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हवाई हल्ले करून घेतला होता.

भारतीय लष्कराने पाकिस्तानी हद्दीत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते, ज्यामध्ये 100 हून अधिक लोक मारले गेले होते. यामुळे वातावरण ताजे आहे. यामुळे खबरदारी घेतली जात आहे. मुंबई पोलिस ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी कार्यरत झाले आहेत. यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती.