पाकिस्तानच्या निशाण्यावर मुंबई? ऑपरेशन सिंदूरनंतर मुंबई विमानतळ परिसरात ड्रोन, परिसरात खळबळ, तपास सुरु..


मुंबई : सध्या भारत-पाकिस्तानमधील वातावरण तापले आहे. पाकिस्तानने केलेल्या कुरापतीनंतर भारताने जोरदार उत्तर दिले आहे. असे असताना मुंबईतील साकीनाका येथे एक संशयास्पद ड्रोन दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई विमानतळाजवळ हा ड्रोन फिरत असल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली आहे. परंतु, त्यांना काहीही संशयास्पद आढळून आले नाही. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. परिस्थितीचं गांभीर्य पाहता प्रशासनाने तातडीने पाऊले उचलली आहेत. साकीनाका पोलीस स्टेशनजवळ हजरत जय्यब जलाल (गैबन शाह दर्गा) मशीद आहे.

याठिकाणी सुरक्षा रक्षकाला संशयित ड्रोन दिसले. ड्रोन काही वेळानंतर जवळच्या झोपडपट्टीमध्ये शिरले. या माहितीनंतर पोलिसांनी लगेच शोध मोहीम सुरू केली. पोलिसांनी माहिती देणाऱ्या व्यक्तीशी बोलून त्याला ड्रोनचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सांगितले. पोलिसांनी झोपडपट्टी परिसरात ड्रोन शोधण्यासाठी मोठी मोहीम चालवली आहे.

पोलीस उपनिरीक्षक आपल्या टीमसोबत परिसरात या ड्रोनचा शोध घेत आहेत. पोलिसांना तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. साकीनाका परिसरातील काही लोकांनी ड्रोनसारखी वस्तू पाहिल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांनी शोध घेतला असता, त्यांना काहीही सापडले नाही.

दरम्यान, मुंबई पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. साकीनाका एअरपोर्टजवळ असल्याने तो भाग खूपच संवेदनशील मानला जातो. या भागात नेहमी पोलीस आणि CISFचे जवान तैनात असतात. याबाबत तपास सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!