Mumbai News : IAS दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, बिल्डिंगच्या १० मजल्यावरून मारली उडी, घटनेने उडाली खळबळ

Mumbai News : देशात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तयारी सुरु असताना मुंबईत एक खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईतील बड्या आयएएस अधिकाऱ्याच्या एका मुलीने मंत्रालयासमोरील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

मुंबईतील आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी या आयएएस दाम्पत्याच्या मुलीने मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची या इमारतीवरुन पहाटे चार वाजता उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
या मुलीचे नाव लिपी रस्तोगी असे आहे. या घटनेमुळे मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

लिपी रस्तोगी मंत्रालयासमोर सुनिती इमारतीत राहत होती. लिपीचे आईवडील दोघेही आयएएस अधिकारी आहेत. वडील विकास रस्तोगी हे सध्या शिक्षण विभागाचे सचिव आहेत तर आई राधिका रस्तोगी या मुद्रा विभाग सचिव आहेत. घटनास्थळी एक सुसाईड नोट आढळून आली आहे, त्यामध्ये लिपी डिप्रेशनमध्ये असल्याचा उल्लेख आहे. Mumbai News

मिळालेल्या माहितीनुसार लिपि रस्तोगी ही एलएलबीचे शिक्षण घेत होती. आज पहाटे ४ च्या सुमारास लिपि हिने कुटुंबियांसोबत राहत असलेल्या सुनीती या इमारतीच्या १० व्या मजल्यावरून उडी मारली, परिणामी तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर खबळल उडाली. परिसरातील नागरिकांनी तातडीने लिपि हीला जीटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तिच्या या निर्णयामुळे तिचे आई वडील आणि कुटुंबीयांना धक्का बसला आहे. मृत्यूपूर्वी तिने सुसाइड नोट लिहिल्याची माहिती आहे.
दरम्यान, विकास रस्तोगी हे १९९७ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. लिपी रस्तोगी ही अभ्यासात तितकीशी पुढे नव्हती. त्यामुळे ती नैराश्यात होती.
आई-वडील इतके मोठे अधिकारी असून आपण त्यासाठी पात्र आहोत की नाही अशी भीती लिपी रस्तोगीला सतावत होती. त्यातूनच तिने आयुष्य संपवल्याची चर्चा मंत्रालय परिसरात चर्चा आहे. दरम्यान, सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.