“मोदी हेच सूर्य, चंद्र, धुमकेतू, शीतल चांदणं, माझा श्वासही मोदींमुळेच”…!


मुंबई: देशात जो प्रकाश पडलाय तो पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच. मोदी हेच सूर्य, मोदी हेच चंद्र, धुमकेतूही मोदीच आहेत. शीतल चांगणं मोदींमुळेच पडतं. नद्यांचं वाहणं, समुद्राचा खळखळाटही मोदींमुळेच होतो, माझा श्वास चालतो, तोदेखील मोदींमुळेच, अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उपहासात्माक टीका केली आहे.

नवी दिल्लीत राऊत यांनी भ्रष्टाचाराचा विषय लावून धरला. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे.

मोदी हे सूर्य आहेत, चंद्र आहेत. धुमकेतू आहेत. पण त्यांनी गेल्या काही काळात निरमा वॉशिंग पावडरचं उत्पादन सुरु केलंय. भाजप धुलाई यंत्र सुरु केलंय. त्याच्यावर बोला. मोदी आणि त्यांची यंत्रणा केंद्रापासून राज्यापर्यंत भ्रष्टाचाराला कवचकुंडलं म्हणून वापरते. गौदम अडानी, नीरव मोदी, विजय माल्या, किरीट सोमय्या यांना कोण संरक्षण देतंय..याच्यावर फडणवीस यांनी बोलावं, असा आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!