MLA Disqualified : पुन्हा तारीख पे तारीख! शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल लांबणीवर, आता ‘या’ दिवशी होणार सुनावणी…

MLA Disqualified मुंबई : महाराष्ट्रातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याचे भिजत घोंगडे ठेवल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने कडक ताशेरे ओढल्यानंतर या मुद्द्यावर सुनावणी झाली आहे. पण शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर यावर्षी तरी निकाल लागण्याची शक्यता कमी आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राहुल नार्वेकर यांनी आज तातडीने सुनावणी बोलावली. विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये ही सुनावणी पार पडली. (MLA Disqualified)
या सुनावणीवेळी दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या सुनावणीनंतर एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट झालीय. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल यावर्षी येणं कठीण आहे. संभाव्य वेळापत्रकात उलट तपासणीचा समावेश आहे.
या प्रक्रियेला किमान ३ महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल यावर्षी डिसेंबरपर्यंत येणं अवघड आहे. तीन महिन्यांनंतर हे प्रकरण निकालात लागण्याची शक्यता आहे.
विधानसभा अध्यक्षांकडे दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून आज करण्यात आली. मात्र या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून विरोध करण्यात आहे. दोन आठवड्यानंतर सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी आहे.
या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टात अहवाल द्यावा लागणार आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई केली, आमदारांचे साक्ष कशाप्रकारे नोंदवण्यात आले, या विषयीचा अहवाल विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टात सादर करतील.