ससून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून, एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची आत्महत्या…!

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अदिती दलभंजन या २० वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली. विद्यार्थिनीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र दुर्दैवाने तिला वाचवण्यात यश आले नाही.
नैराश्यात असल्याने तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. सिंहगड रोडच्या आनंदनगरमध्ये राहणारी अदिती नैराश्यात होती आणि तिच्या कॉलेजच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी धडपडत होती.
बुधवारी सकाळी तिच्या वडिलांनी तिला कॉलेजमध्ये सोडले होते, मात्र अदितीने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सध्या पोलिस तपास करत आहेत.
Views:
[jp_post_view]