राजधानी दिल्लीतील ‘ब्रह्मपुत्रा’ इमारतीला भीषण आग ; राज्यसभेसह लोकसभा खासदारांची अपार्टमेंट्समध्ये…


दिल्ली : ऐन दिवाळीच्या दिवसात राजधानी दिल्लीतील डॉ. दिशंबर दास मार्गावरती असलेल्या ब्रह्मपुत्रा अपार्टमेंट्समध्ये आग लागल्याची माहिती समोर आली आहे.या अपार्टमेंट्समध्ये राज्यसभा आणि लोकसभा सदस्यांची घरे असल्याची माहिती समोर येत आहे.
आगाची घटना घडल्याने सुरक्षा यंत्रणांची प्रचंड धावपळ उडाली. आग लागल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार,संसद भवन परिसर हा अतिशय संवेदनशील मानला जातो. संसद भवनापासून ही इमारत केवळ २०० मीटर दूर आहे. आग लागल्याची घटना समजताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. इमारतीतून काही लोकांना बाहेर काढताना पोलीस दिसून येत आहेत. अनेक व्यक्ती भेदरलेल्या अवस्थेत इमारतीच्या बाहेर उभ्या आहेत. दुपारी दीडच्या सुमारास आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांना कळविण्यात आले आहे.

दरम्यान अग्निशमन विभागाला कॉल करूनही त्यांनी यायला उशीर केल्याचा आरोप इमारतीमधील लोकांनी केला आहे. अग्निशमन दलाचे जवान जर वेळेत आले असते तर कमी नुकसान झाले असते, असे इमारतीमधील रहिवासी यांनी म्हटले आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!