Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांचे मराठा वादळ पुणे जिल्ह्यावर धडकणार! शिरुर शहरात मराठा जनसागराच्या स्वागतासाठी जय्यत तयारी..!!

Maratha Reservation शिरूर : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईला मराठा आरक्षणासाठी निघालेले वादळ सोमवारी (ता.२२) पुणे जिल्ह्यात धडकणार आ अहमदनगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात शिरूर येथील सतरा कमानी पुलावर येताच सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे.
या वेळी पश्चिम महाराष्ट्रचे दार असलेल्या पुणे जिल्ह्यातील शिरुर शहरातील सतरा कमानी पुलाजवळ जरांगे यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार असुन याठिकाणी भव्य असे व्यास पीठ उभारण्यात येत असल्याचे आयोजक सुनील जाधव यांनी सांगितले.
पंचवीस हजार फुड पॅकेटचे वाटप करण्यात येणार आहे शिरुर शहरातुन हि पदयात्रा जाणार असुन शहरातील बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार जरांगे हे घालतील असे सयोजकांच्या वतिने सांगण्यात आले आहे. Maratha Reservation
याविषयी माहिती देताना सकल मराठा समाजाचे स्वयंसेवक सुनील जाधव, जयवंत साळुंके, संभाजी कर्डिले, रुपेश घाडगे, उमेश शेळके, अवी जाधव, स्वप्न्नील रेड्डी, महेंद्र येवले, सुरज काळे, सिध्दांत चव्हाण आदी उपस्थित होते. या वेळी सकल मराठा समाजाच्या वतिने जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे.