मोठी बातमी! शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत मोठी अपडेट..


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

रुग्णालयात उपचार सुरू असल्याने शरद पवार आज बारामती दौऱ्यावर जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, शरद पवार यांना नियमित तपासणीसाठी आणि काही वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या त्यांच्या विविध चाचण्या सुरू असून, त्यांचे अहवाल आल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक स्पष्ट माहिती मिळणार आहे. दरम्यान, मागील महिन्यातही प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आज पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आणि समाधानकारक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांतील प्रकृतीचा विचार आणि त्यांचे वय लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या रुग्णालयात त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या सुरू असून, त्यांचे अहवाल आल्यानंतरच डॉक्टर पुढील उपचारांबाबत किंवा डिस्चार्जबाबत निर्णय घेणार आहेत.

शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्यामुळे त्यांच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आला आहे. बारामतीमध्ये होणारी प्रचाराची सांगता सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात होती, मात्र प्रकृतीमुळे पवार या सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत.

दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज बारामतीतील प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे याही या सभेत सहभागी होणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!