Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत आता हालचालींना वेग, समोर आली सर्वांत मोठी बातमी…

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. येत्या १५ फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत मोठा निणर्य होण्याची शक्यता आहे.
१५ फेब्रुवारीला विधानसभेचं विशेष अधिवेशन होणार असून या अधिवेशनामध्ये मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार आहे. नव्याने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे कायदा बनवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागून राहिले आहे. Maratha Reservation
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्यानंतर राज्य सरकारने कुणबीतील सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील सर्व अटी मान्य केल्या होत्या. तसेच या संदर्भात एक अधिसूचना देखील सराकारने जारी केली होती.
यावर राज्यातील नागरिकांकडून सूचना आणि आक्षेप मागणवण्यात आले होते. त्यानंतर आता अधिवेशनात ही अधिसूचना मंजूर करून तिचं कायद्यात रुपांतर करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या प्रयत्न असणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं हे मोठं यश असेल असे मानले जात आहे.