Manoj Jarange Patil : आरक्षणाचा निर्णय झाला आता पुढे काय? मनोज जरांगे यांचा मोठा निर्णय…

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंसह लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर येऊन धडकल्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे.
काल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते जीआर स्वीकारल्यानंतर रात्री अंतरवाली सराटीत पोहोचले. पण मराठा अध्यादेशाला ओबीसी समाजाने विरोध केला आहे. या आरक्षणाचे पुढे काय होणार? हे येत्या काही दिवसात समजणारआहे .
आता यावरमनोज जरांगे पाटील यांनी महत्त्वाचं भाष्य केले आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांचा सात बारा पक्का झाला आहे, आता वळवळ करायची गरज नाही. कारण या पाच महिन्याच्या संघर्षाने समाजाला खूप काही दिले. सग्या सोयऱ्या याच शब्दाने सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. Manoj Jarange Patil
पुढे ते म्हणाले की, कुणबी नोंदी मिळाल्या त्यांना आरक्षण मिळणार आहे. सगे सोयरे या शब्दात मराठ्याचा किती हित आहे, हे अगोदरच मी हेरल होते. यामुळे अंतरवालीतून सुरू झालेली ही लढाई मुंबईपर्यंत लांब जाईल, असे मला वाटले नव्हते. पण मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या असल्याने मराठा समाजाला आता सक्रीय भूमिका घ्यावी लागेल, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.