राज्य प्रशासनात मोठे फेरबदल! 8 IAS अधिकाऱ्यांची बदली; जाणून घ्या कुणाची कुठे नियुक्ती


मुंबई : महाराष्ट्राच्या प्रशासनात पुन्हा एकदा मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने बुधवारी जारी केलेल्या आदेशानुसार विविध विभागांतील 8 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या विभागांची आणि महत्त्वाच्या उपक्रमांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पुण्यातील महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रुपेश जयवंशी यांची मुंबईतील महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे सामाजिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

श्रीधर दुबे यांची नवी मुंबईतील राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण विकास, महिला बचत गट आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव पंकज देवरे यांची बदली करण्यात आली असून, त्यांची महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात सह महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर विविध प्रकल्पांची जबाबदारी सोपवली जाणार आहे.

याशिवाय जगदीश मिनियार यांची छत्रपती संभाजीनगर येथील सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वर्षा लड्डा यांना महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

डॉ. मंजिरी मनोलकर यांची महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली असून, निलेश सागर यांची पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या बदल्यांची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विकास योजना आणि प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी हे फेरबदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!