१ मेपासून बँकिंग, रेल्वे आणि गॅसच्या दरात होणार मोठे बदल, जाणून घ्या महत्वाची माहिती…


मुंबई : सध्या सुरू होत असलेल्या १ मे २०२५ पासून बँकिंग, रेल्वे आणि गॅस सिलिंडरच्या किमतींसह अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. यामुळे आपल्या सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. यामुळे याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.

यामध्ये आता भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँक खात्यांशी संबंधित सेवा, एटीएम व्यवहार, आणि व्याजदरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तरी येणाऱ्या काळात आपल्याला आर्थिक स्थिती मजबूत करावी लागणार आहे. यामध्ये बदल होणार असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.

तसेच रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांमध्येही कडक निर्बंध लागू होत आहेत. गॅस सिलिंडरच्या किमतींचा मासिक आढावा पुन्हा एकदा घरगुती बजेटवर परिणाम करू शकतो. काही दिवसांपूर्वी याचे दर वाढले होते. सध्या पेट्रोलचे दर स्थिर आहेत.

देशातील ११ राज्यांमध्ये क्षेत्रीय ग्रामीण बँकांचे विलीनीकरण होणार असून, यामुळे बँकिंग सेवांमध्ये कार्यक्षमता वाढण्याची अपेक्षा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मोफत एटीएम व्यवहारांच्या मर्यादेत बदल केले असून, मर्यादा ओलांडल्यास पैसे काढणे, जमा करणे किंवा बॅलन्स तपासण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते.

तसेच मुदत ठेवी (एफडी) आणि बचत खात्यांवरील व्याजदरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काळात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच रेल्वे सेवेत देखील बदल करण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांसाठी १ मे २०२५ पासून तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

नवीन नियमांनुसार, स्लीपर आणि एसी कोचमध्ये प्रतीक्षा तिकिटावर (वेटिंग लिस्ट) प्रवास करण्यास पूर्णपणे मनाई असेल. तसेच आगाऊ तिकीट बुकिंगचा कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांवर आणला गेला आहे, ज्यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी कमी वेळ मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!