Maharashtra : विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी राज्यात २६३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, जाणून घ्या..

Maharashtra : राज्यात २६३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (बुधवार) राज्य पोलीस दलातील मुंबई, नवी मुंबई, मिरा भाईंदर आणि वसई विरारा पोलीस आयुक्तायातील २२१ तर उर्वरित पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा अधिक्षक कार्यालयातील ४२ अशा एकूण २६३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
तसेच आज निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या पत्राच्या अनुषंगाने बदली पात्र असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या या बदल्या करण्यात आल्या. पोलीस महासंचालक आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम. मिल्कार्जन्न प्रसन्ना यांनी हे बदलीचे आदेश काढले आहे.
Views:
[jp_post_view]