Maharashtra Politics : शरद पवार यांचा मोठा नेता भाजपच्या वाटेवर? विनोद तावडे यांच्याशी बंद दाराआड चर्चा, शरद पवारांना धक्का?

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.
दरम्यान जागावाटपावरून मतभेद झाल्यानंतर उमेदवारीसाठी ज्याठिकाणी सोयीचे ठरेल त्या पक्षात इच्छुक पक्षांतर करताना दिसत आहेत. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून भाजपा नेते विनोद तावडे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या भेटी घेतल्या.
यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यातील शरद पवार गटाचे नेते माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. आज सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.
या मेळाव्याला भाजपा नेते विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी मेळावा संपल्यानंतर शरद पवार गटाचे नेते माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड राजकीय चर्चा चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. Maharashtra Politics
दरम्यान, माजी आमदार नाईक भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा काही दिवसापासून सुरू आहेत. याआधीही नाईक भाजपामध्येच होते, पण महाविकास आघाडी सरकार काळात त्यांनी भाजपाला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तावडेंच्या भेटीनंतर नाईक आता पुन्हा एकदा भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.