Maharashtra Election Result : देवेंद्र फडणवीसांचा सहाव्यादा दणदणीत विजय; तर नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव..


Maharashtra Election Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्तासंघर्ष, पक्षफुटी आणि नात्यातील दुरावा यामुळे महाराष्ट्राचे राजकारण देशभरात चर्चेचा एकच विषय होता.या पार्श्वभूमीवर, २० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर आज २३ नोव्हेंबर २०२४ रोजी निकाल जाहीर होतोय

लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभेत भाजप आणि महायुतीला विदर्भात दारुण पराभवाला समोर जावे लागले होते.

मतमोजणीच्या सुरुवातीच्या तीन तासांमध्ये महायुतीला प्रचंड मोठे यश मिळताना दिसत आहे. दरम्यान, राज्यासह देशाचे लक्ष लागून राहीलेल्या अतिशय महत्वाच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीसांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून एकहाती यश खेचत दणदणीत विजय मिळवला आहे.

दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (हे प्रत्यक्ष सहाव्यादा निवडनुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर पहिल्या कलापासून फडणवीस हे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर त्यानंतर जसजशी आकडेवारी पुढे येत गेली त्यानुसार देवेंद्र फडणवीसांच्या विजयी आश्वाची घोडदौड सुरूच असल्याची चित्र आहे.

दरम्यान नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारांचा कौल बघता देवेंद्र फडणवीसांचे बंधु आशिष फडणवीस हे देखील भारावले आहे. यावेळी त्यांनी बोलताना या संपूर्ण विजयाचे श्रेय महायुतीच्या सर्व शेलेदारांना दिले आहे. देवेंद्र फडणवीसांनी सहाव्या फेरीअखेरीस आपल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तब्बल १२, ००९ मतांनी आघाडी कायम ठेवली आहे.

तर आज फडणवीस हे आपल्या नागपूर येथील निवासस्थानी जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांना मोठ्या पराभवाला समोर जावे लागले आहे. ऐकुणात भाजपने मुसंडी मारल्याचे चित्र आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!