Maharashtra Election 2024 : राज्यात बंडखोर सगळं गणित फिस्कटवणार! महायुती-मविआचे १५० बंडखोर निवडणुक लढवणार…


Maharashtra Election 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपांचा तिढा कायम असताना दुसरीकडे या दोन्ही आघाड्यांमध्ये तिढा निर्माण झाल्याचे दिसून येते.

तसेच राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचेही जवळपास १५० बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या लढतीचे अंतिम चित्र हे ४ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल. Maharashtra Election 2024

विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी 29 ऑक्टोबरही मुदत होती. ही मुदत संपेपर्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. काही ठिकाणी आपल्या मित्रपक्षाच्या उमेदवाराविरोधात उमेदवार उतरवण्यात आला. शेवटच्या क्षणी काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. त्याशिवाय, इच्छुक नाराज उमेदवारांनीदेखील बंड करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

बंडखोर वाढवणार टेन्शन…

राज्यातील प्रमुख दोन आघाडींसाठी ही बंडखोरी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये जवळपास ८० ठिकाणी बंडखोर उभे करण्यात आल्याचे चित्र आहे. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची शेवटची तारीख ही ४ नोव्हेंबर आहे.

या दरम्यानच्या कालावधीत बंडोंबांना थंड करण्याचे जोरदार प्रयत्न होणार आहेत. युती-आघाड्यांमध्येही याच कालावधीत चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता असून काही ठिकाणचे उमेदवार मागे घेतले जाण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!