LPG Price : ऑक्टोबरमध्ये महागाईचा स्फोट! LPG सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ, जाणून घ्या नवीन दर…

LPG Price : पुढील दोन दिवसात घटनास्थापन, त्यानंतर दसरा आणि दिवाळी सण येणार आहेत, मात्र त्याआधीच सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे नवीन दर आजपासून, मंगळवार (ता.१) जाहीर करण्यात आले आहेत.
तेल मार्केटिंग कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ४८.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर ५ किलो फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडरही १२ रुपयांनी महागला आहे. या वाढीव किमती आज १ ऑक्टोबरपासून लागू झाल्या आहेत. LPG Price
तसेच घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या १४ किलोच्या घरगुती वापराच्या सिलिंडरची किंमत ८०३ रुपये आहे.सप्टेंबर महिन्यात व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात सुमारे ३९ रुपयांची वाढ करण्यात आली होती.
दरम्यान, आता तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तिसऱ्यांदा वाढ केली आहे. गेल्या ३ महिन्यांत व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किंमतीत एकूण ९४ रुपयांची वाढ केली आहे.