उरुळी कांचन हद्दीतील खेडेकर मळा परिसरात चोरट्यांकडून दु‌कान फोडले ! रक्कम मिळाली नाही म्हणून साहित्याचे नुकसान ..!!


उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील खेडेकर मळा परिसरात असलेले बिल्डींग मटेरियलचे दु‌कान अज्ञात दोन चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. या घटनेत चोरट्यांच्या हाती काही लागले नसले तरी चोरट्यांनी दुकानातील साहित्यांची सुमारे पाच हजारांचे नुकसान करून तोडफोड केली आहे. हि घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

शनिवारी (ता. 18) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असून सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. यामध्ये दुकानात चोरटे प्रवेश करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सागर काळे, रा. डाळिंब, ता. दौंड) असे दुकानातील साहित्यांचे नुकसान झालेल्या मालकाचे नाव आहे.

दरम्यान, उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदवणे, उरुळी कांचन व परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ मागील एक ते दीड महिन्यांपासून सुरु आहे. दुचाकी गाड्या चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. तर सदनिकांचे कडी कोयंडे तोडून ऐवज चोरून नेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!