धक्कादायक! विवाहीत पुरूषासोबत लिव्ह-इनमध्ये रहात होती, त्याचा मुलगा ठरत होता लग्नात अडथळा म्हणून…; घटनेने उडाला थरकाप

नवी दिल्ली : पश्चिम दिल्लीतील इंदरपुरी येथे एका ११ वर्षांच्या मुलाचा मृतदेह त्याच्या घरी बॉक्स बेडमध्ये सापडल्याच्या घटनेने सर्वच हादरले होते. अखेर या घटनेच्या काही दिवासंनी पोलिसांनी या प्रकरणात एका २४ वर्षीय महिलेला अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
पूजा कुमार असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
ही महिला मृत मुलाच्या वडिलांसोबत लिव्ह-इन रिलेशनमध्ये रहात होती. तिला त्याच्याशी लग्नही करायचे होते, मात्र त्यामध्ये त्या इसमाच्या मुलाचा अडसर येत असल्यानेच तिने त्याचा काटा काढण्याचे ठरवले.
मिळलेल्या माहिती नुसार, पोलिसांना १० ऑगस्ट रोजी एक कॉल आला होता. एका अल्पवयीन मुलाचा कथितरित्या गळा दाबून खून करण्यात आला व त्याचा मृतदेह बेडमध्ये सापडल्याचे पोलिसांना समजले. याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले असता रन्होला येथील रहिवासी पूजा ही घटनेच्या दिवशी त्या मुलाच्या घरी गेलेली शेवटची व्यक्ती होती, असे पोलिसांना समजले.
मृत मुलाचे वडील आणि पूजा हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते, अशी माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आरोपी महिलेचा शोध घेण्यात आला असता ती तिच्या आई-वडिलांच्या किंवा कोणत्याच नातेवाईकांच्या घरी सापडली नाही.
दरम्यान, ३०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज चेक करण्यात आले असता पूजा ही रान्होला येथे फिरत असल्याचे आढळले, मात्र तिने तिची जागा लगेच बदलली. अखेर पोलिसांनी तिला बक्करवाला येथून अटक केली.
चौकशीदरम्यान पूजाने सांगितले की, ऑक्टोबर २०१९ मध्ये एका आर्य समाज मंदिरात तिने मृत मुलाच्या वडिलांशी लग्न केले होते. आपण लौकरच पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊ, असेही त्याने पूजाला आश्वासन दिले होते, त्यामुळे ते दोघे एका भाड्याच्या घरात एकत्र राहू लागले.
मात्र घटस्फोटाच्या मुद्यावरून त्याचे व पहिल्या पत्नीचे भांडण झाल्यानंतर, ते (पती-पत्नी) एकत्र राहू लागले होते. यामुळे पूजा अतिशय भडकली. त्यांच्या 11 वर्षांच्या मुलामुळेच तो इसम पत्नीला घटस्फोट देत नाहीये, असे तिला वाटले आणि तिने त्यांच्या मुलाल संपवण्याच कट रचला.
हत्येच्या दिवशी पूजा त्या मुलाचा घरी गेली असता, तिला दरवाजा उघडा दिसला व तो मुलगा बेडवर झोपला होता. तिने त्याचा गळा आवळून त्याला संपवले आणि बेडमध्ये ठेवलेले कपडे बाहे काढून त्या मुलाचा मृतदेह तिथे लपवला, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तिला अटक करण्यात आली असून या घटनेचं पुढील तपास पोलीस करीत आहेत.