लग्नाच्या आधीच संपवला जीव? होणारी बायकोच निघाली खूनी; केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा


पुणे : लोणावळ्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून पडून व्यावसायिक केतन अग्रवाल या तरुणाचा झालेल्या मृत्यूप्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला अपघात मानल्या गेलेल्या या घटनेमागे पूर्वनियोजित कट असल्याचा दावा पोलिस तपासातून समोर आला असून, केतनच्या होणाऱ्या पत्नीवर आणि तिच्या मित्रावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मृत केतन अग्रवाल हा प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. त्याचं लग्न मार्केटयार्डातील मसाल्यांचे मोठे व्यापारी गोयल यांची कन्या सिया गोयल हिच्याशी ठरलं होतं. या दोन्ही मोठ्या व्यावसायिक कुटुंबांमध्ये हा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडणार होता.

जयपूर येथे या ‘बिग फॅट वेडिंग’चं आयोजन करण्यात आलं होतं. या लग्नासाठी चक्क दोन विमानं देखील बूक करण्यात आली होती. मात्र, या भव्य लग्नाआधीच हा धक्कादायक अंत झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल हिला केतन अग्रवालसोबत लग्न करायचं नव्हतं. हा विवाह तिला मान्य नसल्यामुळे तिने केतनला वाटेतून हटवण्याचा भयानक कट रचला. यासाठी तिने आपल्या एका मित्राची मदत घेतली. ठ

रलेल्या कटानुसार, केतनला लोहगड किल्ल्यावर नेण्यात आलं आणि तिथे योग्य संधी साधून सियाने आपल्या मित्रांच्या मदतीने केतनला थेट खोल दरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे. यात केतनचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला हा ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात असल्याचा संशय होता, मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपास केला असता सिया आणि तिच्या मित्रांनी कट रचून हा प्रकार घडवून आणल्याचं उघडकीस आलं आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या हाय-प्रोफाइल मर्डर मिस्ट्रीमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या व्यावसायिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!