Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण राहिली बाजूला अन् भावाच्याच खात्यावर आले पैसे, प्रशासनाचा अजब कारभार, नेमकं काय घडलं?


Ladki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या भलतीच चर्चेत आहे. पण यवतमाळच्या आर्णीत ही योजना वेगळ्याच कारणाने चर्चेत आली. महिलांसाठी सुरु झालेल्या या योजनेचे पैसे चक्क एका पुरुषाच्या खात्यात जमा झाले आहेत.

विशेष म्हणजे, या भावाने ना कोणता अर्ज केला होता, ना कोणती कागदपत्रे सादर केली. तरीसुद्धा त्याच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले. जाफर गफ्फार शेख या तरुणाच्या खात्यात पैसे जमा झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो आर्णी शहरातील हाफीज बेग नगरातील रहिवासी आहे.

सुशिक्षित बेरोजगार असलेल्या जाफर शेख याने ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी कोणताही अर्ज भरला नव्हता. तरीही त्याच्या बँक ऑफ बडोदा या बँक खात्यात या योजनेचे ३ हजार रुपये शासनाने जमा केले आहे. या प्रकाराने खुद्द जाफरही हबकून केला आहे. अनेक महिलांनी गर्दीत लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. Ladki Bahin Yojana 2024

कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांची धावपळ सुरु होती. मात्र आधार लिंक नसल्याच्या कारणाखाली अजूनही अनेक महिलांचे पैसे जमा झालेले नाही.

पण जाफर शेख या तरुणाने साधा अर्जही केलेला नसताना त्याच्या खात्यात तीन हजार जमा झाल्याने शासनाच्या कारभाराबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!