Ketan Tirodkar Arrested : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्यामुळे पत्रकाराला अटक, नेमकं काय घडलं?


Ketan Tirodkar Arrested : माजी पत्रकार केतन तिरोडकर यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणे महागात पडले आहे. केतन तिरोडकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

माजी पत्रकार केतन तिरोडकर यांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, केतन तिरोडकर याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्याने सांगितले की, व्हिडिओमध्ये ड्रग्ज माफियांविरुद्ध कठोर कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  मुंबई गुन्हे शाखेने माजी पत्रकार केतन तिरोडकर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. Ketan Tirodkar Arrested

दरम्यान, याआधी पोलिसांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केतन तिरोडकरला ताब्यात घेतले होते. यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!