Kazakhstan Plane Crash : कझाकिस्तानमध्ये मोठी विमान दुर्घटना! १०५ प्रवासी असलेलं विमान एका क्षणात जळून खाक, ७० जणांचा मृत्यू


Kazakhstan Plane Crash : कझाकिस्तानमधील अकटाऊ शहराजवळ बुधवारी मोठी विमान दुर्घटना घडली. अझरबैजान एअरलाइन्सचे प्रवासी विमान बकू येथून रशियाच्या ग्रोजनी शहराकडे जात होते, मात्र ग्रोजनीतील धुक्यामुळे विमानाचे मार्ग बदलण्यात आले आहे.

तसेच विमानाने १०५ प्रवासी आणि पाच कर्मचाऱ्यांना घेऊन उड्डाण केले होते, मात्र दुर्दैवाने ते अकटाऊ विमानतळाजवळ कोसळले. कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयाच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत अनेक जण मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या दुर्घटनेनंतरच्या व्हिज्युअल्स सोशल मीडियावर समोर आले असून त्यामध्ये विमान जमिनीवर आदळताना आणि त्यानंतर मोठ्या आगीत रूपांतरित होताना दिसते. आतापर्यंत या अपघातात ७० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. Kazakhstan Plane Crash

दरम्यान, धुक्यामुळे ग्रोजनी विमानतळावर उतरण्याची परवानगी मिळाली नाही, त्यामुळे विमानाला मार्ग बदलावा लागला. मात्र, प्रत्यक्ष दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अझरबैजान एअरलाइन्सने या दुर्घटनेवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!