Jaydeep Apte : मोठी बातमी! मालवण पुतळा प्रकरणी अखेर शिल्पकार जयदीप आपटेला कल्याणमधून अटक…


Jaydeep Apte : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून फरार असलेल्या जयदीप आपटेला अखेर अटक करण्यात आली आहे.

कल्याणमधील राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आलीये. जयदीप आपटेला पकडण्यासाठी सात पथकं नेमण्यात आली होती. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या टीमने जयदीप आपटेला आज ताब्यात घेतले आहे.

जयदीप आपटेला अटक करण्यासाठी ५ ते ७ पथकं नेमण्यात आली होती. डीसीपी गुंजाळ यांच्या दालनामध्ये जयदीप आपटेला नेण्यात आलं आहे. त्याची चौकशी देखील सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी या प्रकरणात स्ट्रक्चरल कन्संल्टंट चेतन पाटील याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर ही दुसरी मोठी कारवाई आहे. Jaydeep Apte

छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मालवण मधील राजकोट किल्ल्यावर २६ ऑगस्ट रोजी कोसळला होता. त्या प्रकरणी सिंधुदुर्गातील मालवण पोलीस स्थानकात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यातील एक आरोपी म्हणजे स्ट्रक्चरल कन्संल्टंट चेतन पाटील याला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून जयदीप आपटे फरार होता. त्याला आता कल्याणमधून अटक करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!