Jaydeep Apte : मोठी बातमी! छत्रपती शिवरायांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटेला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी…

Jaydeep Apte : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून फरार असलेल्या जयदीप आपटेला अखेर अटक करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काल अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी जयदीप आपटोला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटेला येत्या १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना झाल्यानंतर राज्यातील नागरिकांना संताप व्यक्त केला होता. या घटनेनंतर या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला होता. घटनेनंतर तब्बल ११ दिवसांनी फरार जयदीप आपटेला काल पोलिसांनी पकडलं आहे.
यानंतर जयदीप आपटेला आज मालवण न्यायालयात हजर करण्यात आलं. अखेर मालवण न्यायालयाने जयदीप आपटेला १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सिंधुदुर्गात शिल्पकार जयदीप आपटेनी बनवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला. त्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला. Jaydeep Apte
पोलिसांनी जयदीप आपटेच्या विरुद्ध लूकआऊट नोटीस देखील जारी केली होती. काल बुधवारी जयदीप आपटे कल्याणमध्ये पोलिसांच्या तावडीत सापडला. आज जयदीप आपटेला कल्याण पोलिसांनी मालवण पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर जयदीप आपटेला मालवणमध्ये आणण्यात आले. त्याला मालवण न्यायालयासमोर हजर करण्यात आले.