छत्तीसगडमध्ये जवानांच्या ताफ्यावर माओवाद्यांच्या भीषण हल्ल्यात ; 3 जवान शहीद..!

सुकमा : गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी दोन जवानांची हत्या केल्याची घटना ताजी असताना ,आता छत्तीसगडमध्ये भ्याड हल्ला केला आहे. जवानांवर माओवाद्यांनी हल्ला केला असून 3 जवान शहीद झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील कुंदेडजवळ ही घटना घडली. सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आहेत. आश्रम पारा जगरगुंडा येथे माओवाद्यांनी गोळीबार करत हल्ला करण्यात आला. पोलीस जवान ऑपरेशनसाठी निघाले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. बेछुट गोळीबार सुरू केला. त्यानंतर जवानांनीही माओवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं.
या चकमकीत 3 जवान शहीद झाले. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावे एएसआय रामुराम नाग, असिस्टंट कॉन्स्टेबल कुंजम जोगा, शिपाई वंजम भीमा अशी सांगण्यात येत आहे.

Views:
[jp_post_view]