साधी दातदुखी ठरली जीवघेणी!! जबडा सुन्न, डॉक्टरचा रिपोर्ट बघून सगळेच हादरले…


नवी दिल्ली : एका व्यक्तीचे दात सतत दुखत होते. तसंच जबडा सुन्न पडल्यानंतर डेन्टिस्टकडे जाऊन तपासणी केली. पण जेव्हा रिपोर्ट आले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्याला प्रोस्टेट कॅन्सर झाल्याचं निष्पन्न झाले आहे.

आपण शरिरातील काही दुखण्यांकडे सामान्य समजून दुर्लक्ष करतो. पण अनेकदा वरवर साधारण वाटणारं हे दुखणं एखाद्या मोठ्या आजाराची चाहूल असते. अशीच ही घटना आता समोर आली आहे.

एका ७० वर्षीय पुरूषाला त्याच्या डाव्या खालच्या प्री-मोलरमुळे वेदना होत असल्याचं वृत्त आहे. अखेर, त्याने डेन्टिस्टकडे जाऊन दात काढण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती एका वेब पोर्टलने दिली आहे.

दात काढल्यानंतरही त्याच्या वेदना कमी होत नव्हत्या. हिरड्यांमध्ये अचानक सूज वाढल्यामुळे त्याला पुन्हा डॉक्टरकडे जावं लागलं. सीटी स्कॅन केल्यानंतर, डेन्टिस्टला त्याच्या जबड्यात जखम आढळली. यानंतर त्याला पुढील तपासणीचा सल्ला देण्यात आला.

अनेक चाचण्या केल्यानंतर त्याची जखम मेटास्टॅटिक प्रोस्टेट कर्करोग असल्याचं निष्पन्न झालं. हा कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो. इतर अनेक कर्करोगांप्रमाणे, प्रोस्टेट कर्करोग जबड्यात पसरु शकतो, अशी माहिती डेंटममधील ओरल सर्जन डॉ. आंद्रेज बोझिक यांनी दिली आहे.

प्रोस्टेट कॅन्सरची नेमकी लक्षणं काय?

साधारणपणे, प्रोस्टेट कर्करोगाची सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही चिन्हं किंवा लक्षणं दिसून येत नाहीत. ज्यामुळे ते ओळखणे कठीण होते. जर एखाद्या व्यक्तीला प्रोस्टेट कर्करोग झाला असेल तर त्याला लघवी करण्यात त्रास होणे, लघवीच्या प्रवाहात शक्ती कमी होणे, लघवीमध्ये रक्त येणे, वजन कमी होणे, इरेक्टाइल डिसफंक्शन इत्यादी लक्षणे दिसू शकतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!