काळा पोशाख, डोक्यावर भगवं उपरणं अन् ‘जय श्री राम’चा नारा; नवनीत राणांची बुलेट राईड सोशल मीडियावर चर्चेत…!

अमरावती : रामनवमीनिमित्त खासदार नवनीत राणा यांचा नव्या अंदाजातील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नवनीत राणा यांनी डोक्याला भगवं उपरणं बांधलेल दिसत आहे. त्याचबरोबर काळा पंजाबी ड्रेस परिधान करून त्यांनी बुलेट स्वारी केल्याचे या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.
“ना हार की फिकर करते है, ना जित का जिकर करते है.. जय श्रीराम” असे म्हणत नवनीत राणा यांनी बुलेटस्वारीला सुरुवात केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. सध्या सोशल मियद्यावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.
Views:
[jp_post_view]